अकोले (अहमदनगर) : इंजेक्शन एजन्सीकडून थेट रुग्णाच्या नावाने इंजेक्शन द्यावे, अशी मागणी राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे नेते सुशिलकुमार चिखले यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
चिखले म्हणाले की, जिल्हा प्रशासन सध्या रेमडेसिविर इंजेक्शन थेट हॉस्पिलटच्या नावाने देत आहे. मात्र, हॉस्पिलटमध्ये जेवढे रुग्ण दाखल आहेत, तेवढे इंजेक्शन मिळत नाहीत. हॉस्पिटलने चाळीस इंजेक्शनची मागणी केल्यास प्रशासन दहाच इंजेक्शन देते. त्यामुळे उर्वरित तीस रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनची शोधाशोध करत फिरतात. हॉस्पिटलला जी इंजेक्शन मिळतात. ती थेट रुग्णांच्या नावाने येत नसल्याने ती कुणासाठी वापरायची याचा अधिकार हॉस्पिटलला असतो. यात बयाचदा वशिलेबाजी होऊ शकते. त्यामुळे जे गरजू रुग्ण आहेत, त्यांचीच नावे प्रशासनाने मागवावी व थेट त्या नावानेच इंजेक्शन द्यावे.
तसेण डॉक्टरांनी बिल पाहिल्याशिवाय इंजेक्शन वापरु नये. त्यातून काळा बाजार थांबेल, असेही चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.