Saturday, December 21, 2024
Homeराज्यदहावीचे ऑनलाइन हॉल तिकीट आजपासून मिळवा, वेळापत्रक पहा एका क्लिकवर !

दहावीचे ऑनलाइन हॉल तिकीट आजपासून मिळवा, वेळापत्रक पहा एका क्लिकवर !

पुणे : दहावीची परीक्षा (SSC Exam) 15 मार्चपासून सुरू आहे. दरम्यान दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.

दहावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट http://www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाइन हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि मुख्याध्यापकांची सही, शिक्का मारून विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. 

एमपीएससीची (MPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

यंदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची घोषणा बोर्डानं केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावटातून हळू हळू मुक्त होत असताना यावेळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. 

दहावीचे वेळापत्रक जाहीर

15 मार्च – प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)

16 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा

19 मार्च – इंग्रजी

21 मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)

22 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)

24 मार्च – गणित भाग – 1

26 मार्च – गणित भाग 2

28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2

1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1

4 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 2

देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं

हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर 


प्रा.अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या १३ महिलांचा विहिरीत पडून मृत्यू, गावावर शोककळा

संबंधित लेख

लोकप्रिय