Saturday, October 5, 2024
Homeराज्यएमपीएससीची (MPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

एमपीएससीची (MPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवारी २६ फेब्रुवारी, २०२२ रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले आहे, आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून विद्यार्थांना ऑनलाईन हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देखील परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात आयोगाने ट्विट करून माहिती दिली आहे.

त्याच बरोबर कोरोना नियमांचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेला येताना तसेच हॉलतिकीट डाऊनलोड करताना काय काळजी घ्यावी याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय