Monday, June 24, 2024
Homeताज्या बातम्याMDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

FSSAI : हाँगकाँग आणि सिंगापूरने एव्हरेस्ट आणि एमडीएच कंपन्यांच्या काही उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली होती. यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नेपाळसह अनेक देशांनी भारतीय मसाल्यांना मॉनिटरिंग लिस्टमध्ये टाकले होते. यानंतर अन्न नियामक FSSAI ने 22 एप्रिलपासून देशभरातून नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. आता या बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

भारतीय बाजारपेठेत उपलब्ध मसाल्यांसाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड (ईटीओ) चे प्रमाण आढळले नसल्याचा दावा केला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मंगळवारी ही माहिती दिली. FSSAI ने एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांचे 34 नमुने घेण्यात आले होते. विशेषतः, महाराष्ट्र आणि गुजरातमधील एव्हरेस्टचे 9 नमुने आणि दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमधील MDH च्या 25 नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले.

MDH आणि Everest या लोकप्रिय मसाल्यांच्या ब्रँड्सवर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण आढळले होते. ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. मात्र, अन्न नियामक FSSAI ने भारतीय बाजारपेठेतील मसाल्यांचे नमुने तपासल्यानंतर त्यात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण आढळले नसल्याचा म्हटले आहे.

FSSAI

मॉनिटरिंग बॉडीने चाचणीसाठी एव्हरेस्ट स्पाइसेसच्या दोन उत्पादन युनिटमधून 9 नमुने घेतले, तर एमडीएचच्या 11 उत्पादन युनिटमधून 25 नमुने घेण्यात आले. एकूण 34 नमुन्यांपैकी 28 नमुन्यांचे अहवाल आले असून त्यात ईटीओचे प्रमाण नाही. त्याच वेळी, इतर ब्रँडच्या मसाल्यांच्या 300 नमुन्यांपैकी एकही ईटीओ आढळला नाही.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय