Free Education : बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण (Free Education) मिळणार आहे. बारावीनंतर उच्च शिक्षणातील तब्बल 642 कोर्सेसचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. मुलींची शिक्षणातील टक्केवारी वाढावी. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून मुलींचा विवाह करून देणे हा प्रकार थांबावा. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. याचा जवळपास 20 लाख मुलींना याचा फायदा होणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षणातील तब्बल 642 कोर्सेसचे शुल्क शासनामार्फत भरले जाणार आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून होणार आहे.
Free Education
मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा संबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये यांनी त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे. या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते, पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे.
हेही वाचा :
‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान
कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी
ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती