Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

आमदार महेश लांडगे यांचा शोक : ‘आमच्यासह नवी पिढी पोरकी होतेय…’

---Advertisement---

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपहापौर सुदामराव हिरामणराव लांडगे यांचे आकस्मित निधन झाले. भाजपाचे युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनामुळे इंद्रायणीनगर आणि भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुदामराव लांडगे यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘ माझे चुलते पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे आकस्मित निधन झाले. माझा सहकारी आणि भाजपा युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. शहराच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. लांडगे कुटुंबियांचा आणखी एक मार्गदर्शक हरपला आहे. 

---Advertisement---

दोनच दिवसांपूर्वी गोपीकृष्ण धावडे यांचे वडील आज शिवराज लांडगे यांचे वडील आम्हाला सोडून गेले. ‘‘कायम आधार’’ वाटणारे ही माणसं अशी सोडून जात आहेत. त्यांची उणीव कधीही न भरुन येणारी आहे. किंबहूना आमच्यासह नवी पिढी पोरकी होत आहे, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी शोक व्यक्त केला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles