दिंडीगुल (तामिळनाडू) – तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात गुरुवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. (Fire)
मृतांमध्ये एक लहान मूल, तीन पुरुष आणि तीन महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.अनेकांना गंभीर दुखापत झाल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
दिंडीगुल-तिरुची महामार्गाजवळ असलेल्या गांधी नगर भागातील रुग्णालयात ही आग लागली. तीन अग्निशामक गाड्या आणि १० हून अधिक ॲम्ब्युलन्सेस घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या गाड्या रुग्णालयात अडकलेले रुग्ण आणि कर्मचारी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील होत्या.
दिंडीगुल जिल्ह्याच्या कलेक्टर एम.एन. पूनगोडी यांनी सांगितले की, जखमी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सुमारे २०० लोक होते, त्यात १०० हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. (Fire)
“खाजगी रुग्णालयात आग लागली होती. सर्व रुग्णांचा बचाव करून सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल
मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर
ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर
बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती