नांदगाव खंडेश्वर : परभणी येथील संविधान अवमान प्रकरणी झालेल्या निषेध आंदोलनातील भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून परभणी येथील प्रकरणाची न्यायीक चौकशी करा, नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांचे मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले.
तहसीलदार यांचे मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयीन चौकशी हे सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता विद्यमान न्यायाधीशामार्फत करण्यात यावी, कलम 1769(1अ ) सी आर पी सी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यावर हत्येच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1)आणि 1(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत, पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्हीचे फुटेज जप्त करून ते तपासण्यात यावे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारने त्वरित 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी. कुटुंबातील एका व्यक्तीस त्वरित शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावे. या मागणीसह अन्य मागण्याची निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवेदन देतेवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड श्याम शिंदे, अंकेश खंडारे, किशोर शिंदे, सुनील लांडगे, दीपक अंबाडरे, राहुल मोहोड, आकाश खडसे, राजेंद्र राऊत, मोहसीन शेख, प्रवीण गावनर, अ. राजिक शेख, शहेनशहा,संजय ढोके, लक्ष्मण झिमटे, राहुल इंगोले, आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
Somnath Suryavanshi
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी