Saturday, December 14, 2024
Homeताज्या बातम्याJalgaon : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

Jalgaon : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

Jalgaon : जळगाव धरणगाव-चोपडा मार्गावरील पिंपळे फाट्याजवळ शनिवारी सकाळी बस-ट्रॅक्टरचा भीषण झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून २१ प्रवासी जखमी झाले आहेत. जळगाव शिरपूर मार्गे धावणारी बस (क्रमांक एमएच १४ बीटी ३९१०) आणि ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ ईजी ३९५२) यांच्यात हा भीषण अपघात झाला.

शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बसने मागून जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, बसचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून बसमधील २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. बसचालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघात झाल्यानंतर जखमी प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले घटनास्थळी पोहोचले. धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे काही दिवसांपूर्वीच झालेल्या बस अपघातात २८ प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या मार्गावर मोठा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सध्या जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. धरणगाव-चोपडा मार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Jalgaon

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर

लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…

काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल

संबंधित लेख

लोकप्रिय