मुंबई : मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी तसेच शिक्के वापरल्याची घटना घडली आहे, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. Fake signature, stamps of Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर चक्क मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि संशायस्पद शिक्के आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री सचिवालयास नियमितपणे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शेरे असणारी विविध निवेदनं आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी प्राप्त होत असतात. पुढे या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होते आणि नंतर ई ऑफिस प्रणाली नोंद करून संबंधित विभागांना पाठवली जातात.
यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून काम करावे, अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे
मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा