Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Elon Musk : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांनी ईव्हीएम AI द्वारे हॅक होऊ शकते असा दावा केला आहे. या दाव्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. भारतीय निवडणूकांमध्ये EVM मशीनच्या वापराबाबत गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा झाल्या. मतदानासाठी EVM चा वापर करू नये अशी मागणी काही विरोधी पक्षांनी केली होती. मात्र आता लोकसभा निवडणूक संपून 12 दिवस झाले आणि नवे सरकार देखील स्थापन झाले आहे. अशात इलॉन मस्क (elon musk) यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (elon musk) यांनी ईव्हीएम AI द्वारे हॅक होऊ शकतात आणि ते दूर केले पाहिजेत, असे म्हणत त्यांनी अमेरिकन निवडणुकांमधून ईव्हीएम काढून टाकण्याची मागणी केली. मस्क यांनी हे विधान अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी जूनियरच्या पोस्टला प्रतिसाद देत आहे.

अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार केनेडी ज्युनियर यांनी असोसिएटेड प्रेसचा हवाला देत ट्विटरवर पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘प्वेर्तो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित शेकडो मतदानातील अनियमितता नोंदवण्यात आली आहे. सुदैवाने पेपर ट्रेल होता, त्यामुळे समस्या ओळखण्यात आली आणि मतांची संख्या दुरुस्त करण्यात आली. ज्या भागात पेपर ट्रेल नाही तिथे काय होते याची कल्पना करा.

---Advertisement---

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी एलोन मस्क यांच्या पोस्टला रिट्वीट करत भारतात ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्ससारखे आहे. त्याची चौकशी करण्यास कोणालाही परवानगी नाही. असे म्हटले आहे. तसेच जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles