Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत आतापर्यंत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते वितरित करण्यात आले असून, या योजनेचा लाभ पुढेही सुरू राहील, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने आत्ताच्या पुरवणी मागणीत या योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे योजनेच्या माध्यमातून पात्र बहिणींना नियमित आर्थिक सहाय्य मिळत राहील. “माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“माझी लाडकी बहीण” योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना असून, ती महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय.
ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.
Ladki Bahin Yojana
हे ही वाचा :
कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी