Monday, December 23, 2024
Homeजिल्हाDYFI कोल्हापूर जिल्हा अधिवेशन संपन्न, नूतन जिल्हा कमिटी जाहीर

DYFI कोल्हापूर जिल्हा अधिवेशन संपन्न, नूतन जिल्हा कमिटी जाहीर

कोल्हापूर : आज दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे कोल्हापूर जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाची सुरुवात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाली. अधिवेशनास DYFI राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. अनिल वासम, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे शाम आडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कॉ. अनिल वासम यांनी संघटनेच्या कार्या विषयी आणि सध्याची देशातील तरुणांची अवस्था, धर्मांधता, महागाई – बेरोजगारी आणि आपल्या समोरील आव्हाने यावर मांडणी केली. 

राज्यातील सामाजिक सलोख बिघडवण्याचे प्रयत्न – राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात एकजूट उभारा – कॉ.शिवगोंडा खोत

यावेळी नवीन एकूण 11 सदस्यांची जिल्हा कमिटी गठित करण्यात आली. त्यात कॉ. प्रफुल्ल पाटील यांची जिल्हा अध्यक्षपदी, कॉ. तुषार किल्लेदार यांची जिल्हा सचिवपदी, कॉ. स्वागत कांडेकरी यांची जिल्हा उपाध्यक्ष, कॉ. विनय कोळी यांची जिल्हा सहसचिव, कॉ. संदेश जाधव यांची कोषाध्यक्ष पदी तर कॉ. ज्ञानेश्वर पडळकर, कॉ. अतुल तेली, कॉ. प्रमोद मोहिते, कॉ. पवन माने, यांची जिल्हा कमिटी सदस्य पदी निवड झाली. उर्वरित दोन पदे राधानगरी तालुक्यासाठी रिक्त ठेवण्यात आली आहेत. 

नवीन जिल्हा कमिटीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. राजेश वरक यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी युवक चळवळीतील त्यांचे अनुभव सांगितले आणि नवीन कमिटीस पक्षाच्या जिल्हा कमिटी कडून सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले आणि  शुभेच्छा दिल्या. 

12 वी पास व पदवीधारांना रेल्वेत नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

यावेळी किसान सभेचे कॉ. चंद्रकांत कुरणे, ज्येष्ठ कॉ. नारायण गायकवाड उपस्थित होते. नूतन अध्यक्ष कॉ. प्रफुल्ल पाटील यांनी समारोप करत असताना भविष्यात जिल्ह्यात मोठे संघटन उभे करू आणि तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देत सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय