जुन्नर / आनंद कांबळे : राजमाता जिजाऊ महिला विकास मंचातर्फे महिला दिनानिमित्त जुन्नर येथील महादेव गार्डन येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. राजमाता जिजाऊ मंचाने महिला दिनानिमित्त 20 मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी 10 पासून रात्री बारा वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालू होते.
यामध्ये मी सौभाग्यवती जुन्नरकर स्पर्धा नृत्य स्पर्धा सहभोजन, बक्षीस वितरण आणि रात्री महिलांसाठी खास लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी पंधराशे महिला उपस्थित होत्या. नृत्य स्पर्धेत अठरा वर्षाच्या मुली पासून सत्तर वर्षाच्या आजी पर्यंत अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
आप तर्फे राजगुरूनगर येथे शहिदांना मानवंदना !
मोठी बातमी : एसटी चे विलिनीकरण नाहीच, शासनाने अहवाल स्विकारला
या कार्यक्रमास सीमा शरद सोनावणे तसेच राजश्री बेनके तसेच त्याच प्रमाणे सुमित्रा शेरकर, जयश्री जोशी, पूजा बुट्टे या मान्यवर महिला देखील होत्या. या कार्यक्रमात जिजाऊ सदस्यांनी केलेले नृत्य आकर्षक ठरले महिलांनी हात उंचावून शिट्ट्या वाजवून आपली पसंती दर्शवली या कार्यक्रमास जमलेल्या पंधराशे महिलांची भोजन व्यवस्था आकर्षक बक्षिसे तसेच पैठण यांचा लकी ड्रॉ ही सर्व व्यवस्था जिजाऊ मंचाच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून केली होती. डाँ.वर्षा गुंजाळ व मंगल बेळे या दोन कर्तृत्ववान महिलांना तेजस्वीनी पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अलकाताई फुलपगार, ज्योती चोरडिया, राखी शहा, सुजाता लुंकड, जोत्स्ना महाबरे, सुरेखा जहर, राजश्री कांबळे, अनुराधा गरिबे, वैशाली भालेकर, स्वाती पवार, रत्ना घोडेकर, संगीता बेळे, नयना राजगुरव, चारुशीला घायवट, सरिता डोके, वैष्णवी पांडे, गीतांजली डोके, मंगल शिंदे, नेहा गाजरे, भूमीशा खत्री, पुनम नरोटे, स्वाती डोंगरे, संगीता नांगरे, नंदा कानडे, ज्योती कदम, विजया डोके, अलका वाकचौरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री कांबळे आणि अनुराधा यांनी केले तर आभार राखी शहा यांनी मानले.
विशेष लेख : भगतसिंग एक विचारांचा प्रवाह !
शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी !