Tuesday, November 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआप तर्फे राजगुरूनगर येथे शहिदांना मानवंदना !

आप तर्फे राजगुरूनगर येथे शहिदांना मानवंदना !

भगत सिंग यांच्या नावाने सैनिक प्रशिक्षण संस्था  सुरु करून आप ने शाहिदांना वाहिली खरी श्रद्धांजली – चेतन बेंद्रे

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी जाऊन 23 मार्च रोजी शाहिद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या या तिन्ही क्रांतिकारी हुतात्म्ये देशातील तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. पंजाब मधील आप सरकारचा शपथविधी शहीद भगतसिंग यांच्या गावांमध्ये घेऊन आणि दिल्लीमध्ये शहीद दिनाच्या औचित्यावर भगत सिंह यांच्या नावाने दिल्ली मध्ये 14 एकर मध्ये शहिद भगत सिंग सैनिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येणार आहे, या मध्ये रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्स मुलांना मोफत प्रशिक्षण देणार आहेत. ही संस्था चालू करून आम आदमी पार्टीने शहिदांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिल्याचे आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी सांगितले.

मोठी बातमी : एसटी चे विलिनीकरण नाहीच, शासनाने अहवाल स्विकारला

मोठी बातमी : सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाईही वाढणार !

भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दडपण्यासाठी 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी दिली. परंतु शहिदांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्याचे आंदोलन शमण्याऐवजी अधिकच तीव्र झाले. भारतीयांच्या मनामनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जगवण्याऱ्या हा दिवस शहीद दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.

क्रांतिकारकांनी दिलेल्या प्राणाच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने स्वीकारलेल्या संविधानावर निष्ठा ठेवून काम करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे आपच्या मंजुषा नयन म्हणाल्या. याच बरोबर वहाब शेख, वैजनाथ शिरसाट, अशोक तनपुरे या आपच्या पदाधिकाऱ्यांनी शहिदांना अभिवादन केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न, नवनिर्वाचित राज्य सचिव आणि कमिटी जाहीर !

याप्रसंगी अनुप शर्मा, राज चाकणे, किशोर जगताप, वहाब शेख, स्मिता पवार, अशोक तनपुरे, डॉ.अमर डोंगरे, वैजनाथ शिरसाठ, मंजुषा नयन, डॉ. निखिल आसावा, चंद्रमनी जावळे, ब्राह्मनंद जाधव, विजय अब्बाड, सरोज कदम, संदीप पाटील, नितीन सईद, निखिल बालिघाटे, आशुतोष शेळके, स्वप्निल जेवळे, शुभम वाटमारे आदी आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय