Monday, December 23, 2024
Homeजिल्हाघोटभर दारू व मूठभर चिवड्यात आपले 'मत' विकू नका - दशरथ मडावी

घोटभर दारू व मूठभर चिवड्यात आपले ‘मत’ विकू नका – दशरथ मडावी

यवतमाळ : बिरसा क्रांती दल, महिला फोरम तर्फे सुयोग मंगल कार्यालय, यवतमाळ येथे रविवार दि.१३ मार्च ला जागतिक महिला दिन, क्रांतिवीर सोमा डोमा, क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची संयुक्त जयंती व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दशरथ मडावी बोलत होते. 

भारतीय घटनेने एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य ,असा अमूल्य मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना दिला. त्याचा असा अपमान करू नका. आपल्या मताची किंमत ओळखा, सहज त्याला असे घोटभर दारू व मुठभर चिवड्यात विकू नका असा संदेश दशरथ मडावी यांनी दिला. यावेळी सभागृहात असलेल्या जनतेने सुद्धा मोठा प्रतिसाद दिला.

निवृत्ती महाराज देशमुख व पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यावर अपंगांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून बिरसा क्रांती दलाचे राज्य अध्यक्ष रंगराव काळे, महिला फोरमच्या अध्यक्षा गिरीजा उईके, माधुरीताई मडावी, मुख्याधिकारी नगर पालिका यवतमाळ, डी.बी. अंबुरे, व्ही.डी.कोवे, किरण कुमरे, कैलास बोके, वसंत कनाके, नारायणराव पिलवंड, श्रीमती हरनाबाई पेजेवाड, श्रीमती जीजाबाई भोयर, शेखर मडावी, मारोती उईके, अर्जुन यूवनाते, रमेश भिसनकर, तुकाराम जुमनाके, प्रकाश ढगे, रमेश मडावी, नागोराव गेडाम, शिवनारायण भोरकडे, रेखा पोयाम, शारदा वानोळे, सोनी जुनघरे, मिरा मडावी, शारदा वानोळे, अशोक ढोले, विमल फोले, काशिनाथ खरवडे, संतोष इंगळे, विलास दलसिंगारे, रोहीदास घोगेवाड, भिमराव खारोडे, अंबादास उमरे, संगित पवार, केशव बोरकर, हनुमंत पारधी, रामेश्वर ढगे, निलेश उकंडे, नामदेव पेंदोर, विजय काळे, योगेश मडावी उपस्थित होते.

   

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बिरसा क्रांती दलाचे प्रेरणा गीत सामूहिकरित्या घेण्यात आले. उपस्थित सर्व महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नागपुरात होणार !

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माधुरीताई मडावी, हरणाबाई पेजेवाड, नारायणराव पिलवंड, चिरंजीव शिवांश भोरकडे यांचा मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास बोके यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका डी.बी अंबुरे यांनी मांडली. यावेळी माधुरीताई मडावी यांनी महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहा असे आवाहन केले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेजर जीवन कोवे, अतुल कोवे, अजाब कोडापे, शुभम चांदेकर, शरद मडावी, हेमंत मेश्राम, अनंता पांडे, महिला फोरमच्या रेखा पोयाम, डॉ.कविता भोयर, आशा वड्डे, मंगला कोडापे, वैशाली मडावी, आशा बोके, सोनु जुनघरे, या बिरसा क्रांती दल व महिला फोरमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील बिरसा क्रांती दलाच्या महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय मडावी, प्रणाली अगलधरे यांनी तर आभार अनिल पेंदोर यांनी मानले.

आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरण होताच तात्काळ कारवाई होणार !

आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम, अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय


संबंधित लेख

लोकप्रिय