Tuesday, January 21, 2025

पिंपरी येथे आम आदमी पार्टीचा ‘स्वराज्य संकल्प मेळावा’ संपन्न


रहिवाशी, निवासी क्षेत्रातील अनधिकृत घरांचे कायदेशीर उत्तरदायित्व तपासणार !

नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि मूलभूत प्रश्न हेच आमचे व्हिजन डाक्युमेंट – चेतन बेंद्रे

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीचा पिंपरी चिंचवड मधील अत्रे सभागृहामध्ये दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत आणि पिंपरी चिंचवड चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या उपस्थिती मध्ये आपच्या इच्छुक उमेदवारांचा स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.

पालिकेने अनधिकृत ठरविलेल्या घरांमध्ये शहरातील 30 टक्के लोकसंख्या राहते, घरे नियमितीकरणाची किचकट प्रक्रिया सुलभ करण्यात आली नाही. महानगरपालिकेने त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला नाही. मात्र, दंड, शास्तीकर किती भरायचा? हा लक्षवेधी मुद्दा पुढे येतो. रोगापेक्षा ईलाज भयंकर असल्यास नागरिक कशाला पुढे सरसावतील परिस्थिती `जैसे-थे` राहू द्या म्हणतील. त्यामुळेच धोरणे आखण्यासाठी जेवढा आटापिटा केला जातो. तोच प्रयोग अंमलबजावणीसाठी व्हावा. जास्तीत जास्त नागरिकांना प्रत्यक्षात लाभ मिळावा, हीच अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

निवृत्ती महाराज देशमुख व पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यावर अपंगांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी


जुन्नरमधील बिबट सफारी पार्क स्थलांतरास विरोध, माजी आमदार शरद सोनवणे करणार आमरण उपोषण

सत्ताधा-यांनी ही घरे अधिकृत करण्याच्या निर्णयाचा जो गाजावाजा करत प्रचार केला त्या प्रक्रियेद्वारे आकारले जाणारे शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारे नसेल तर असल्या फसव्या घोषणा काय कामाच्या?त्यामुळे संविधानिक निवारा हक्काच्या अंतर्गत विधी तज्ञमार्फत घरे अनियमित, अनधिकृत की बेकायदेशीर याचा निर्णय घेण्यात येईल, ही सर्व घरे नागरिकांच्या मालकीची होतील, असा प्रयत्न निश्चित करू, नागरिकांच्या गरजा, मूलभूत प्रश्न हेच आमचे व्हिजन डाक्युमेंट असेल, असे आम आदमी पार्टीचे  कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी मेळाव्यात स्पष्ट केले आहे. यावेळी प्रचार प्रमुख राज चाकणे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष वहाब शेख, महेश बिराजदार आणि महिला शहराध्यक्ष स्मिता पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

धक्कादायक : भगोरिया जत्रेत भररस्त्यात पुरूषांच्या टोळीकडून तरुणीवर अत्याचार, १५ जण ताब्यात

आम्ही काल्पनिक घोषणा, आश्वासने देत नाही. पंजाबच्या जनतेने ज्याप्रमाणे आप ला स्वीकारले त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मधील सुज्ञ जनता सुद्धा आम आदमी पार्टी ला नक्कीच स्वीकारेल, असे मुकुंद किर्दत यांनी सांगितले. यावेळी अनेक नवीन कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. या मेळाव्यात नंदू नारंग, डॉ. रामेश्वर मुंडे, वैजनाथ शिरसाठ, डॉ‌. अमोल डोंगरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात इच्छुक उमेदवारांच्या वतीने आपले विचार मांडले यशवंत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल मोरे व मंगेश आंबेकर यांनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles