Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमुलीच्या विवाह सोहळ्या निमित्त कामगार नेत्यांचे वारकऱ्याना फराळ वाटप, घराच्या अंगणात...

मुलीच्या विवाह सोहळ्या निमित्त कामगार नेत्यांचे वारकऱ्याना फराळ वाटप, घराच्या अंगणात केले वृक्षारोपण

आळंदी : चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार नेते जीवन येळवंडे अध्यक्षस्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांनी सुविद्य कन्या ऐश्वर्या हिच्या विवाहप्रीत्यर्थ आज दि.२६ मे २०२२ रोजी अपरा एकादशी त्याच बरोबर येळवंडे पा. आणि ठाकूर पा. यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आळंदी मध्ये वारकऱ्यांना फराळ वाटप केले.

त्याचबरोबर त्यांनी मुलीच्या नावाने आपल्या घराच्या अंगणात रोप लावून त्याचे मुली सारखे संगोपन करण्याचा निश्चय केला आहे. त्याच बरोबर झाडें लावा झाडें जगवा…लेक शिकवा लेक वाचवा. हा संदेश ही देण्यात आला आहे.

यामध्ये जीवन येळवंडे, बाळशेठ ठाकूर, निलेश मुळे, गणेश ताठे, अतुल ढोले, सचिन निदाने, रघुनाथ मोरे, दत्ता गवारे उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

राज्यात कोरोना वाढतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले “हे” आवाहन

आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ?मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !


संबंधित लेख

लोकप्रिय