Friday, July 12, 2024
HomeNewsआई वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांना कोर्टाचा मोठा दणका !

आई वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांना कोर्टाचा मोठा दणका !

 

हरिद्वार  : एसडीएम न्यायालयानंच नुकताच एक ऐतिहासिक निकाल देत आई वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांना मोठा दणका दिला आहे.

काही वृद्धांनी आपल्या आपल्या मुलांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यावर सुनावणी करताना न्यायालयानं त्या वृद्धांच्या मुलांना संपत्तींतून बेदखल करत महिनाभरात घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाच्या आदेशाचं पालन न झाल्यास पोलीस प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे.

एसडीएम कोर्टात हरिद्वारच्या ज्वालापूर, कानखल आणि रावली मेहदूद भागातील सहा वृद्ध जोडप्यांनी खटला दाखल केला होता. आपली मुलं आपली अजिबात काळजी घेत नाहीत. ना त्यांच्या आजारपणात औषधाचा विचार करतात, ना त्यांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देतात, असं त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर भांडण आणि आपल्याला मारहाण केल्याचंही त्यांनी खटला दाखल करताना न्यायालयाला सांगितलं होतं.

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

वृद्ध दाम्पत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत मुलांना स्थावर आणि जंगम मालमत्तेतून बेदखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी हरिद्वार एसडीएम कोर्टात सुनावणी सुरू होती. बुधवारी एसडीएम न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला असून पोलिसांना ३० दिवसांत घर रिकामे करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोना वाढतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले “हे” आवाहन

इंडियन बँक मध्ये 312 रिक्त पदांसाठी भरती, 36000 ते 76000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय