जुन्नर / आनंद कांबळे : इनरव्हील क्लब नारायणगावच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023/24 साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सहाणी दत्तक म्हणून घेण्यात आली. आज संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व स्पोर्ट शूजचे वाटप करण्यात आले. शाळेसाठी एक संगणक, वॉटर प्युरिफायर व मुलांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य देण्यात आले. Distribution of educational material in Vadgaon Sahani School
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वडगाव सहाणी गावच्या आदर्श सरपंच वैशाली तांबोळी यांनी भूषविले. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रीती शहा, सेक्रेटरी रश्मी थोरवे, खजिनदार ॲडव्होकेट सुनीता चासकर, आयएसओ चार्टर्ड प्रेसिडेंट अंजली खैरे, एडिटर समृद्धी वाजगे, इनरव्हील क्लबच्या सदस्या डॉक्टर नंदिनी घाडगे, सुनीता कोल्हे, प्रांजल भाटे, वर्षा तांबे, ज्योती सोमवंशी, समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हेचे प्राचार्य उत्तम शेलार, श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राध्यापक शरद मनसुख उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण हभप ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांनी संगणकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक गीत सादर केले. युवा फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील शिंदे, मदन वाबळे, पंकज शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल ज्ञानेश्वर तांबोळी, शैलेश वाबळे, रमेश महाराज वाबळे, मंगेश वाबळे, जयेश वाबळे, गणेश तांबोळी, युवा फाउंडेशन, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वडगाव सहानी तसेच गावातील अनेक संस्थांचे पदाधिकारी महिला, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर भोर, व्हाईस चेअरमन अतुल शिंदे, संचालक एकनाथ थोरात, एकनाथ तांबोळी, पोलीस पाटील गणेश जेडगुले, भाऊसाहेब तांबोळी हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
उत्तम शेलार यांनी आधुनिक काळाची गरज ओळखून सर्व ग्रामस्थांना गावोगावी ग्रंथालय सुरू करण्याचे आव्हान केले. शरद मनसुख यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे व भौतिक सुविधा कडे अधिकचे लक्ष देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. युवा कीर्तनकार ह. भ. प. प्रसाद महाराज वाबळे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्याचे भविष्य घडत आहे. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मंगेश वाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट अंजलीताई खैरे यांनी विद्यार्थ्यांना जे जे आवश्यक असेल ते पुरवण्याचे आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले. इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी रश्मीताई थोरवे यांनी जिल्हा परिषद शाळेतून देशाचे उज्वल भवितव्य घडत आहे असे मनोगत व्यक्त केले. इनरव्हील क्लबच्या खजिनदार सुनिता चासकर यांनी इनरव्हील क्लब ची माहिती व या कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशाली तांबोळी यांनी जिल्हा परिषद शाळा वडगाव सहानी ही शाळा दत्तक घेतल्याबद्दल इनरव्हील क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवा फाउंडेशन, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचे मोलाचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे यांनी केले तर आभार उपशिक्षक बाळासाहेब बांबळे यांनी मानले.