Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Junnar : ठाकरवाडी जिल्हा प्राथमिक शाळेस वह्या वाटप 

जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी(तेजूर) येथे आमदार वल्लभशेठ बेनके विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आमदार अतुल बेनके यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.  Junnar : Book distribution to Thakarwadi District Primary School

---Advertisement---

यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब देवाडे, भिवाडे बु.च्या सरपंच कमलताई शेळकंदे, तेजूरच्या सरपंच अनिताताई जाधव, माजी संरपच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय गावडे, किसन जाधव, रविंद्र दुधवडे व शिक्षकवृंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन, स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक आ.का.मांडवे यांनी केले.

---Advertisement---

भाऊसाहेब देवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्याशी सुसंवादही साधला. तानाजी तळपे व लक्ष्मण कुडेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर सूत्रसंचलन सचिन नांगरे यांनी केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles