Saturday, December 21, 2024
Homeजुन्नरव्हिडिओ : देवराम लांडे यांची अजित पवार, नाना पटोले यांच्याशी भेट, लांडे...

व्हिडिओ : देवराम लांडे यांची अजित पवार, नाना पटोले यांच्याशी भेट, लांडे कुठल्या घरी करणार वापसी ? चर्चेला उधाण !

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली, शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक दिग्गज नेतेही शिवनेरी किल्ल्यावर आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्याच बरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.

या भेटीनं पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आता शिवसेना मधून बाहेर पडलेले देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असताना आता पटोले यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

व्हिडीओ बघा !

कोरोना निर्बंधांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना घोड्याच्या पायाखाली चिरडले

लांडे आणि पटोले यांच्या भेटी दरम्यान बोलताना पटोले म्हणाले की, पुन्हा घरवापसी करा, यावर देवराम लांडे यांनी देखील मिश्किल हास्य करत प्रतिसाद दिला आहे. 

दरम्यान, देवराम लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत कोणती चर्चा झाली का हे गुपितच आहे. परंतु अजित पवारांचा जवळचा संपर्क असलेले आणि लांडे यांचा मुलगा अमोल लांडे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आहेत, अशा स्थितीत देवराम लांडे हे कोणत्या पक्षात जाणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

कृषि योजना : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

संबंधित लेख

लोकप्रिय