Saturday, October 12, 2024
Homeजिल्हाकोल्हापूरकरांचा रोटी डे मोठया उत्साहात साजरा!

कोल्हापूरकरांचा रोटी डे मोठया उत्साहात साजरा!

कोल्हापूर / रत्नदिप सरोदे : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा म्हणून सगळीकडेच प्रचलित आहे. प्रत्येकजण आपआपले प्रेम आपल्या प्रिय व्यक्तींवर या महिन्यात वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. याच प्रेमाच्या महिन्यात कोल्हापूर युथ मूव्हमेंट्स मात्र निराधार, भुकेलेल्यांसाठी एक घास प्रेमाचा या उद्देशाने फेब्रुवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी “रोटी डे” हा उपक्रम 2019 पासून सुरू करण्यात आला. 

हा उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवला जातो. आणि यातून लोकांना मदतीसाठी आव्हान केले जाते. त्याच मदतीच्या अनुषंगाने कोल्हापूरकर या उपक्रमात सहभागी होऊन प्रतिसाद देतात. 

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

ज्यांना शक्य आहे ते लोक शिजवलेले तयार अन्न रोटी डे दिवशी बिंदू चौक येथे आणून देतात. ( उदा:- भात, भाजी, आमटी, चपाती, भाकरी, पोहे, शिरा, उप्पीट ) यासह अन्य पद्धतीने त्या दिवशी मदत स्वरूपात देतात. या प्रकारे तयार/शिजवलेल्या स्वरूपात आलेली मदत आम्ही सर्व सदस्य त्या दिवसभरात कोल्हापुरातील विविध ठिकाणी म्हणजेच ज्याठिकाणी निराधार, फिरस्ते, भुकेलेले असतात त्यांच्या पर्यंत ते तयार खाद्यपदार्थ पोहचवण्यात येते आणि ज्यांना शिजवलेले तयार अन्न देण्याकरिता जमत नाही ती लोक धान्य – वस्तू स्वरूपात मदत देतात. ( उदा:- तांदूळ, साखर, डाळी, तेल, पीठ, चटणी, मीठ, गहू, ज्वारी, कोरडा खाऊ ) यासह अन्य वस्तू स्वरूपात मदत करतात. ही वस्तू स्वरूपात आलेली मदत अनाथ आश्रम, कृष्ठरोग धाम, अंधशाळा, खेडोपाडी डोंगराळ भागात असलेल्या वाड्या वस्त्या याठिकाणी जाऊन ही वस्तू स्वरूपातील मदत गरजुपर्यंत पोहचवली जाते.

या उपक्रमात संस्थेच्या अध्यक्षा वसुधा निंबाळकर, उपाध्यक्षा ज्योती चौगुले, खजाणीस शितल पंदारे, सचिव प्रणव कांबळे, अक्षय चौगुले, निलेश बनसोडे, समीर जमादार, शिवराम बुध्याळकर, स्नेहल शिर्के, निलांबरी जांभळे यांच्यासह शेकडो कोल्हापूरकर उपस्थित होते.

कोरोना निर्बंधांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना घोड्याच्या पायाखाली चिरडले

“विद्यार्थी आपले भविष्य आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा” जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय