मुंबई :मुंबईत आज महाविकास आघाडीचा मोर्चा आणि आंदोलने सुरू होती.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना(उद्धव ठाकरे),कम्युनिस्ट पक्षांसह विविध संघटनांचे हजारो कार्यकर्ते राज्यपालांच्या निषेधार्थ सामील झाले होते.
प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर मुलीचे लग्न असूनही दिवसभर ड्युटी करत होते.पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या मुलीचे लग्न असतांना देखील त्यांनी घरच्या कर्तव्यापेक्षा ड्यूटीच्या कर्तव्याला प्राधान्य दिले. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.