Thursday, December 12, 2024
Homeराज्यकोविड सर्वेक्षण कामकाजातून अंगणवाडी सेविकांना वगळण्याची मागणी मान्य.

कोविड सर्वेक्षण कामकाजातून अंगणवाडी सेविकांना वगळण्याची मागणी मान्य.

प्रतिनिधी  : अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ विषाणू सर्वेक्षणाच्या कामकाजातून वगळण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने करण्यात आली होती. याची दखल घेत हि मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मान्य केली असून त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड-१९ सर्वेक्षण कामकाज अंगणवाडी सेविकांवर लादल्यामुळे अंगणवाडीचे काम सफल होत नव्हते. कोरोनाचे काम केल्यानंतर गर्भवती, स्तनदा माता, लहान बालके यांची भेट घेणे धोकादायक होते. त्यानंतर कोरोनापासून संरक्षण करणारी साधने देखील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जात नव्हती. याच बरोबर कोणताही वाढीव भत्ता देखील दिला जात नसल्या कारणाने आम्ही हि मागणी केली होती, ती मान्य करण्यात आली आहे.

शुभा शमीम, राज्य महासचिव

अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू)

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीद्वारे कोविड-१९ सर्वेक्षण कामकाजातून अंगणवाडी सेविकांना वगळण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याचबरोबर लॉकडाऊन काळातील काम करत असताना अंगणवाडी सेविकांना उद्भवणाऱ्या समस्या देखील यामध्ये लिहिण्यात आल्या होत्या. अंगणवाडी केंद्र बंद राहावीत, वैद्यकीय, तांत्रिक कामे अंगणवाडीवर सोपवू नयेत, वजनमापे घेण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी. तसेच प्रतिबंधित भागात अंगणवाडीच्या कामास स्थगिती मिळावी. याचबरोबर ५५ वर्षावरील व व्याधिग्रस्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामातून वगळण्यात यावं, या मागण्या देखील संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, शुभा शमीम, कमल परुळेकर, भगवान देशमुख, जयश्री पाटील,  सुवर्णा  तळेकर आदीनी राज्य सरकारच्या संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय