Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयझोपडपट्टीला भीषण आग, आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यु तर 30 झोपड्या जळून...

झोपडपट्टीला भीषण आग, आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यु तर 30 झोपड्या जळून खाक

Photo : Twitter

नवी दिल्ली : दिल्लीतील गोकुळपुरी परिसरात मोठी दुर्घटना झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजता गोकुळपुरी पीएस परिसरात आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाचे पथकाला देण्यात आली. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, आगीत 30 झोपड्या जळून खाक झाल्या असून सात जणांचा मृत्यू झाला. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे, मात्र ही आग कशी लागली, याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल दुख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हंटले आहे कि, “सकाळी ही दु:खद बातमी ऐकायला मिळाली. मी स्वतः तिथे जाऊन पीडित कुटुंबांची  भेट घेईन”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय