Monday, July 1, 2024
Homeताज्या बातम्याDelhi Airport : दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

Delhi Airport : दिल्ली-एनसीआरमधील पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (IGI) टर्मिनल-1 येथील पार्किंगचे छत शुक्रवारी पहाटे 5 वाजता कोसळले. या अपघातात कारमध्ये बसलेल्या कॅब चालकाचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. जखमींवर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्ली अग्निशमन सेवा, पोलीस, सीआयएसएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. (Delhi Airport)

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्यांनी सांगितले की, टर्मिनल-1 येथे सकाळी देशांतर्गत उड्डाणांसाठी पार्किंग क्षेत्रात वाहनांची मोठी रांग लागली होती. यावेळी पार्किंगचे छत कोसळले. छताचा जड भाग आणि तीन लोखंडी सपोर्ट बीमही वाहनांवर पडले. या वेळी याठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या बीममध्ये गाडल्या गेल्या.

किंजरापू विमानतळ टर्मिनलवर झालेल्या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींना त्यांनी भरपाई जाहीर केली आहे. टर्मिनलच्या छताखाली अडकून प्राण गमावलेल्यांना 20 लाख रुपये आणि जखमींना 3 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार असल्याचे मंत्री म्हणाले.

Delhi Airport accident

दरम्यान, या दुर्घटनेबाबत काँग्रेसने आरोप केला की, पंतप्रधान मोदींनी यावर्षी १० मार्च रोजी टर्मिनल-१ चे उद्घाटन केले होते, त्याचे छत कोसळल्यामुळे हा अपघात झाला. मोदींनी 3 महिन्यांपूर्वी जबलपूर विमानतळाचे उद्घाटनही केले होते. तेथेही एक दिवसापूर्वीच एका अधिकाऱ्याच्या गाडीवर विमानतळाचे शेड पडले होते.

तसेच, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी काँग्रेसला प्रत्यूतर देत दावा केला की टर्मिनल 1 चा जो भाग कोसळला तो 2009 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात बांधला गेला आणि त्याचे उद्घाटन झाले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय