आयटक चे राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे निश्चित !
वर्धा : केंद्र सरकार कामगारविरोधी कायदे केले आहेत. बँक एल आय सी, रेल्वे चे खाजगीकारण करून विक्री केली जात आहे. योजना कर्मचारी बहुसंख्य असून महिला असून त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. जगण्यासाठी इपीएस 95 पेन्शनर्स ला दरमहा 9 हजार रुपयेसह महागाई भत्ता दिले पाहिजे. कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे, आदी मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी धोरण विरोधात 28, 29 मार्च 2022 रोजी देशव्यापी संप यशस्वी करण्याचे आवाहन कॉम्रेड दिलीप पवार आयटक राज्य उपाध्यक्ष यांनी आयटक महाराष्ट्र राज्य बैठकीच्या 5, 6 मार्च 2022 सुरू असलेल्या वर्धा बैठकीच्या आयटक कामगार केंद्र सुरू असलेल्या अंतिम सत्राच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केले. विचारमंच वरती शिवकुमार गणवीर, बबली रावत, प्रकाश बनसोड, आयटक राज्य सरचिटणीस शाम काळे होते.
आयटक संलग्न विविध संघटना च्या फेडरेशन अहवाल मांडण्यात आले. आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, घरकामगार मोलकरीण, बांधकाम कामगार, औद्योगिक कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, पोषणाहार कर्मचारी, ग्रामरोजगारसेवक, कंत्राटी कामगार कर्मचारी, ग्राम रोजगारसेवक, विडी कामगार फेडरेशन आदींचे अहवाल मांडण्यात आले.
हातपंप देखभाल कर्मचाऱ्यांची राज्य बैठक संपन्न
बैठकीत संघटना चर्चेत अहवालवर राजू देसले, शंकर पुजारी, बबली रावत, निळू दिलीप उटाणे, विनोद झोडगे, संजय मांढवदरे, उदय चौधरी, आदींनी भूमिका मांडली.
8 मार्च जागतिक महिला दिनी महिला कामगार, कर्मचारी प्रश्नी मागणी दिन पाळण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने घरकामगार मोलकरीण मंडळा ला 500 कोटी रुपये द्या. बांधकाम कामगार , मोलकरीण मंडळ साठी साठी स्वतंत्र कर्मचारी अधिकारी नेमा. केंद्र सरकारने कामगार विरोधी केलेले कायदे राज्य सरकारने लागू करू नये. असे ठराव करण्यात आले.
भांडखोर सुन आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !
नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण
जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे