दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच यशस्वी रित्या पार पडला. या कार्यक्रमास दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन डॉ. प्रसाद करमरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश जगदाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रथमेश भोसले आणि सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मुलुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी सौरभ घांगुर्डे, नगरसेविका शिवानी खानविलकर, गौरी खटावकर, जयवंत काटकर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वेळच्या महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सध्याच्या महाविद्यालयाची जडणघडण पाहून त्यांनी अभिमान आणि कौतुक व्यक्त केले.
या प्रसंगीच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांसाठी काही फनी गेमस् चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन महाविद्यालयातील विविध विभाग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना इ. पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, त्याची पुढील प्रगती जाणून घेण्यासाठी उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र मोरे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डी. डी. कुळकर्णी, तसेच प्रा. शंतनु कदम, प्रा. विश्वेश जोशी यांसह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.