Saturday, December 7, 2024
HomeNewsमुलुंडमधील हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलुंडमधील हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : कोकणवृत्तसेवा आणि ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट & ट्रेनिंग तर्फे 29 जानेवारीला हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबीर मुलुंडमधील सार्वजनिक शिक्षण संस्थेचे पुरंदरे हायस्कूल येथे उत्स्फूर्तपणे पार पडले. या क्षेत्रातील तज्ञ संतोष(भाई) पालव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून शिबीरास सुरुवात झाली.

उद्घाटनावेळी राजकीय पत्रकार ईटीव्ही भारत काशिनाथ म्हादे वेळात वेळ काढून याठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते भाई पालव यांचा सत्कार करण्यात आला.हौसिंगसंबंधी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. ऍड. प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकाराने शिबीर पार पडले.

हौसिंग सोसायटी म्हणजे काय? त्याची नोंदणी झाल्यावर असणारी व्याख्या पालव यांनी नेमकेपणाने सांगितली. घर खरेदी विक्री करार, सदस्य अर्ज, उपविधीनुसार कामकाज, सोसायटी व्यवस्थापन आदी अनेक बाबी सखोलपणे सांगण्यात आल्या. सार्वजनिक शिक्षण संस्था अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी शिबिरासाठी वर्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. भूषण भिसे आणि संदीप घोलप यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

लोकप्रिय