दापोडी : जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालय, दापोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन प्र.प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते गोरक्ष ब्राह्मणे हस्ते करण्यात आले.
यावेळी गोरक्ष ब्राह्मणे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याविषयी विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक / प्राध्यापक्तेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!
उपस्थितांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. सोमनाथ दडस, सुरेखा हारपुडे, प्रा. अमरदीप गुरमे, प्रा. वसंत साळुंके, प्रा. वैभव वरडुले, प्रा. उत्तमगोरड, प्रा. विनोद डिके, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. ज्योती लेकुले, लक्ष्मण कोहिणकर, काताराम खामकर, लक्ष्मण मुरकुटे, हनुमंत गायकवाड, वंदना दळवी, नंदा काशीद, मंदाकिनी आढाव, निलम सोनवणे कपिल कांबळे हे उपस्थित होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आभार प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी मानले.
तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार
ऊस, वीज व विमा प्रश्नी किसान सभा मैदानात, 16 मार्च पासून राज्यभर आंदोलन !