जुन्नर (आनंद कांबळे) : जुन्नर बस स्थानकाच्या आवारात पिकअप वाहनाची पुढील दोन चाके हवेत उचलत मागील दोन चाकावर पिकअप गाडी चालवीत धोकादायक स्टंट करनाऱ्या चालक युवकाला जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Junnar)
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे स्टंट होत असल्याची चीत्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने हा प्रकार पुढे आला होता. संबंधित वाहनचालक शहाजी सोनवणे रा.जुन्नर याच्यावर बस स्थानकाच्या आवारातील प्रवासी व नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Junnar)
संध्याकाळच्या वेळेस शाळा तसेच महाविद्यालय सुटल्यानंतर गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस स्थानकावर मोठी गर्दी असते. बसची वाट बघत हे विद्यार्थी बस स्थानकाच्या आवारातील झाडाखाली उभे असतात. या ठिकाणी फिरणारे रोड रोमिओकडुन विद्यार्थिनींना त्रास देन्याचे प्रकार होत असतात. यातुनच पिकअप वाहनाच्या धोकादायक स्टंटचा प्रकार घडला आहे.
शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत बस स्थानक आवारात तसेच स्थानकासमोरील रस्त्यावर जुन्नर पोलिसांची गस्त सुरू झाल्यास या प्रकारास आळा बसेल. फक्त शाळाच नाही तर माध्यमिक विद्यालयाच्या परीसरात देखील विद्यालय सुटल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मारामाऱ्या झाल्याच्या घटना घडत आहेत.
नुकतेच एका विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये लोखंडी गज व काठ्यांनी मारामाऱ्या झाल्याच्या घटनेनंतर या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली होती. त्यामुळे विद्यालय सुटल्यानंतर देखील पोलिसांनी एखादा चक्कर मारल्यास किरकोळ मारामारीतून उद्भवणाऱ्या गंभीर प्रसंगास आळा घालता येईल.
(Junnar)
हे ही वाचा :
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी