Friday, November 22, 2024
Homeजिल्हाCPIM : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड जयसिंग माळी यांचे निधन

CPIM : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड जयसिंग माळी यांचे निधन

नंदुरबार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) ज्येष्ठ नेते, राज्य कमिटीचे भूतपूर्व सदस्य व सध्या विशेष निमंत्रित सदस्य, तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. जयसिंग माळी यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज शनिवार, दि. १६ मार्च २०२४ रोजी दुःखद निधन झाले.

सरंजामी आणि भांडवली शोषण आणि अत्याचाराचे भीषण चटके सोसणाऱ्या आदिवासींना स्वाभिमानाने लढण्याची दीक्षा कॉ. जयसिंग अखेरच्या श्वासापर्यंत देत राहिले. गत शतकातील सत्तरीच्या दशकापासून कॉ. कुमार शिराळकर, कॉ. जयसिंग माळी, कॉ. नत्थु साळवे व इतर अनेकांनी श्रमिक संघटनेची स्थापना केली. १९८२ साली त्यातील अनेक जण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. गेली पाच दशके कॉ. जयसिंग माळी हे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या पाठीशी पहाडासारखे अचलपणे उभे राहिले. जमीनदार व त्यांच्या गुंडांच्या अनेक हल्ल्यांना ते निधड्या छातीने सामोरे गेले. (CPIM)

माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी अतीव दुःख व्यक्त करत म्ह्टले आहे की, कॉ. जयसिंग माळी यांच्यासारखा पक्षावर आणि पक्ष जोपासत असलेल्या क्रांतीच्या कल्पनेवर असीम निष्ठा असलेला झुंजार नेता पक्षाने गमावला आहे. त्यांच्या धक्कादायक निधनाने राज्यातील पक्ष कार्यकर्ते अतीव शोकमग्न झाले आहेत.

त्यांनी रुजवलेले निधडेपणाचे, शोषणमुक्त समाज निर्मितीचे बीज जोपासत ते वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील सारे पक्ष कार्यकर्ते जिवाचे रान करतील, अशी ग्वाही देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी या लढाऊ कॉम्रेडला अखेरचा लाल सलाम करत आहे. त्यांच्या लढाऊ व निष्ठावंत पत्नी कॉ. तापीबाई माळी व त्यांच्या कुटुंबियांच्या, तसेच धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या दुःखात राज्य कमिटी सहभागी आहे, असेही डॉ. नारकर म्हणाले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी दु:ख व्यक्त करत म्हटले आहे की, कॉ. जयसिंग माळी यांचे पक्षासाठी, किसान सभेसाठी, शेतमजूर युनियनसाठी, आणि श्रमिक, आदिवासी, व दलित चळवळीसाठी गेल्या पाच दशकांतील योगदान फार मोठे आहे.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, केल्या मोठ्या घोषणा…

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

संबंधित लेख

लोकप्रिय