Saturday, December 21, 2024
Homeताज्या बातम्याbus reservation : दिव्यांगांना एसटीच्या सर्व बस मध्ये आरक्षण महामंडळाचा मोठा निर्णय

bus reservation : दिव्यांगांना एसटीच्या सर्व बस मध्ये आरक्षण महामंडळाचा मोठा निर्णय

मुंबई, (दि.५) : दिव्यांग प्रवाशांना या पुढे एसटी च्या सर्व प्रकारच्या बस मध्ये आरक्षित आसन कायम स्वरुपी देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती कोणत्याही थांब्यावर बस मध्ये चढल्यास त्याला त्याचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास यापुढे सुखकर व आरामदायी होणार आहे. (bus reservation)

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आसने निश्र्चित केली आहेत. साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याचा जबाबदारी संबंधित वाहकची असेल याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बस मधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी. असे निर्देश महारष्ट्र राज्य मार्ग परिवन मंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिले आहेत.(bus reservation)

दिव्यांगांना पुढीलबस प्रकार आणि क्रमांकाचे आसने आरक्षित असतील
१) साधी बस – ३,४,५,६
२) निम्मआराम – ३,४
३) ई – शिवाई – ३,४,५,६
४) शिवशाही – ३,४,५,६
५) विना वातानुकूलित शयनयान -७
६) ईव्ही -९ मी ३५ आसनी – ३,४
७) मिडी – ३०,३१
८) विना वातानुकूलित शयनआसनी – ६
९) शिवनेरी/जन शिवनेरी – १३,१४

संबंधित लेख

लोकप्रिय