Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : शक्तिपीठ बाबत सरकार झुकले हे शेतकरी आंदोलनाचे यश – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्यातील महायुती खोके सरकारचा महत्त्वाचा प्रोजेक्ट असलेला “शक्तिपीठ” महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, या प्रकल्पामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या २७ हजार हेक्टर जमिनी बाळकावल्या गेल्या असत्या म्हणून शेतकऱ्यांनी विरोध केला आणि आंदोलने केली त्याला यश मिळाले असून शक्तीपीठ बाबत सरकार झुकले हे शेतकरी आंदोलनाचे यश असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले. (PCMC)

महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांच्या विरोध वाढतच गेला त्यातच लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये हे महायुती आणि खोके सरकारला त्याचा फटका बसला, अनेक अनावश्यक प्रकल्प केले जात आहेत त्यांना आता जाग आलेली आहे. शक्तीपीठ हा महायुती सरकारचा महत्त्वकांक्षी म्हणून मिरवले गेले ८०२ किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला जोडणारा व तीन शक्तीपीठाने जोडणारा म्हणून त्याला हे नाव देण्यात आले मात्र शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आता सरकार भानावर. आले असून भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे या लढाईत सहभागी सर्व शेतकऱ्यांना सलाम व अभिनंदन करतो असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन कडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (PCMC)

---Advertisement---

****

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles