मुंबई : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. करोना काळातील लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण येत असल्यामुळे गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीतील आणखी दोन मंत्री अडचणीत, गुन्हा दाखल !
करोना काळात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे करोना काळातील 188 अंतर्गत दाखल गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझा या वाहिनीवर बोलताना दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाचे याबाबतचे आदेश आम्ही घेणार आहोत. असे वळसे-पाटील म्हणाले.
“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, यांची सरकारवर टीका
दरम्यान, ‘राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल. त्यानंतर सरकार निर्णय घेईल. नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,’ असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
दरवर्षी तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची “यांनी” केली घोषणा