LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा सुरू आहेत. त्यात काँग्रेसकडून आत्तापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या 5 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. LokSabha Election
आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 12 उमेदवारांच्या नावांची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने 23 मार्च रोजी 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तर काँग्रेसने आतापर्यंत 5 याद्यांमधून 186 उमेदवार जाहीर केले होते. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून राजस्थानमधील 4 आणि तामिळनाडूतील 1 उमेदवाराच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. अजमेर, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि तामिळनाडूतून तिरुनेलव्हेली या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ
‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !