Monday, December 23, 2024
Homeजिल्हाTeachers : शाळांमधील शिक्षकांमध्ये सेवा ज्येष्ठतेवरून गोंधळ

Teachers : शाळांमधील शिक्षकांमध्ये सेवा ज्येष्ठतेवरून गोंधळ

पुणे (राजेंद्रकुमार शेळके) : खासगी अनुदानित माध्यमिक उच्च्च माध्यमिक संयुक्त शाळांमधील शिक्षकांमध्ये सेवाज्येष्ठतेवरून गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याद्यापक, पर्यवेक्षक पदे रिक्त आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील शिक्षणसंस्था चालकांनी नियमबाह्यरीत्या सेवाज्येष्ठता याद्यांमधील क्रमांमध्ये परस्पर बदल करू नये, शालेय शिक्षण विभागाने जिल्हा किंवा उपसंचालक स्तरावर सेवाज्येष्ठतेच्या नियमावलीनुसार सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी बी.एड. नियुक्त माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हिंदुराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली. (teachers)

राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक संयुक्त शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि इतर विभाग कार्यरत आहेत. या शाळांमध्ये विविध विभागांत कार्यरत असलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता निर्धारित करण्यासाठी अधिनियम १९७७ आणि महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली १९८१ मध्ये काही मार्गदर्शक तरतुदी दिलेल्या आहेत. १९७७ च्या कायद्यात राज्य शासनाने कोणत्याही विधेयकाद्वारे दुरुस्ती केलेली नाही. मात्र, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून नियमबाह्य व असंविधानिकपणे अधिनियम १९७७ सेवाज्येष्ठता निकर्षामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात राजपत्र पारित केले. (teachers)

याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जून २०२० ला नागपूर जिल्ह्यातील एका डी.एड. शिक्षिकेने याचिका दाखल केली होती. या याचिकेत प्रतिवादी म्हणून बी. एड. नियुक्त माध्यमिक शिक्षक संघ होता. यात सर्वोच्च न्यायालयाने बी. एड. नियुक्त माध्यमिक शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. तसेच मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही खंडपीठांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या आक्षेपार्ह नोंदींसंदर्भातील याचिका न्यायप्रविष्ट आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

संबंधित लेख

लोकप्रिय