धारूर : माकपचे व जेष्ठ शेतकरी नेते कॉ. काशिराम सिरसट व त्यांचा मुलगा हानुमंत सिरसट या दोघांना कोरानाची लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती माकपचे धारूर तालुका सचिव डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ. काशिराम सिरसट व त्यांचा मुलगा हानुमंत सिरसट यांचा १३ एप्रिल रोजी कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्यांच्यावर धारूर येथील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. ७ दिवसांच्या उपचारानंतर २० एप्रिलला दोघांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्या नंतर त्यांना कोविड सेंटर धारूर येथुन सुट्टी देण्यात आली आहे. ते आता आठ दिवस विश्रांती घेतल्या नंतर लगेच चळवळीसाठी वेळ देणार असल्याची माहिती दिली.
करोनाची दुसरी लाट : आज पासून राज्यभरात कडकडीत लॉकडाऊन ?