पटना : बिहारमधील मुजफ्फरपूर येथे २६ मे २०२५ रोजी एका ८ वर्षांच्या अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार आणि क्रूर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. (Patna rape case) या हल्ल्यात तिचा गळा चिरला गेला आणि चाकूने अनेक वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले. रविवारी (१ जून २०२५) सकाळी पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (पीएमसीएच) येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी २६ मे रोजी सकाळी ११ वाजता आपल्या घरी असताना आरोपी रोहित कुमार साहनी (वय ३०) याने तिला कुरकुरे आणि चॉकलेट देण्याच्या आमिषाने फसवून घरापासून दूर नेऊन एका निर्जन ठिकाणी, तलावाजवळ, बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा चिरला आणि चाकूने अनेक वार करून तिला अधमरे अवस्थेत सोडून दिले. स्थानिकांनी तिला जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर तातडीने पटना येथील एम्स रूग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून उपचार करण्यास नकार दिल्या आरोप पीडितेच्या कुटूंबीयांनी केला आहे.
५ तासांपेक्षा जास्त वेळ उपचारांविना अॅम्ब्युलन्समध्येच ठेवले
त्यानंतर तिला मुजफ्फरपूर येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (एसकेएमसीएच) मध्ये नेण्यात आले, मात्र तिथेही तिच्यावर वेळेवर उपचार झाले नाही तिला तब्बल ५ तासांपेक्षा जास्त वेळ अॅम्ब्युलन्समध्येच उपचारांविना ठेवण्यात आले असे गंभीर निष्काळजीपणाचे आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालय प्रशासनावर केले आहेत. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)
रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप | Patna rape case
मुलीच्या कुटुंबीयांनी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आरोप केला आहे की, पीएमसीएचमध्ये मुलीला दाखल करून घेण्यासाठी तब्बल ५ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. मुलीला १ जून रोजी दुपारी १:२३ वाजता अॅम्ब्युलन्समधून पीएमसीएचच्या केंद्रीय आपत्कालीन विभागात आणले गेले. मात्र, रुग्णालयाने तिला तातडीने दाखल करून घेण्यास नकार दिला आणि तिला कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात पाठवण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा : धक्कादायक : 73 वर्षीय आजीला लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखांची फसवणूक)
कुटुंबीयांचा दावा आहे की, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगून तिला अॅम्ब्युलन्समध्येच ठेवण्यात आले. दुपारी काँग्रेसच्या बिहार युनिटचे प्रमुख राजेश राम यांच्या हस्तक्षेपानंतर सायंकाळी ५ वाजता तिला अखेर दाखल करून घेण्यात आले, परंतु तोपर्यंत तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. रविवारी सकाळी ८:१५ वाजता तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या काकांनी सांगितले, “ती अॅम्ब्युलन्समध्ये तासंतास तडफडत होती. आम्ही रुग्णालय प्रशासनाला विनंती करत राहिलो, पण त्यांनी आम्हाला बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच तिला दाखल करून घेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.” (हेही वाचा : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : आरोपींच्या वकिलांचा वैष्णवीचे चारित्र्यहनन करणारे युक्तिवाद)
पीएमसीएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंद्रशेखर ठाकूर यांनी या आरोपांना खोडून काढताना सांगितले की, रुग्णालय प्रशासनाने कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. “मुलीला दुपारी १:२३ वाजता आणले गेले आणि तातडीने तिला ईएनटी विभागात पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. प्रशासनाला माहिती मिळताच सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. डॉक्टरांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले, पण तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती,” असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. तथापि, कुटुंबीय आणि स्थानिक नेते यांच्या दाव्यांमुळे रुग्णालयाच्या या खुलाशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (हेही वाचा : OYO साठी नवीन नाव सुचवा आणि जिंका ₹3 लाख ; रितेश अग्रवाल यांची अनोखी ऑफर)
पोलिस कारवाई
पोलिसांनी आरोपी रोहित कुमार साहनी याला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, खून आणि अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिकांचा दावा आहे की, यापूर्वीही साहनीने गावातील एका १२ वर्षांच्या मुलीवर असाच हल्ला केला होता, परंतु ती मुलगी बचावली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. (हेही वाचा : मोठी बातमी : पुण्यात एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना कारने उडवले, आज होता पेपर)