मनमाड : रेल्वे खाजगीकरणाच्या विरोधात मनमाड रेल्वे स्टेशन येथील सहाय्यक वरिष्ठ अभियंता कार्यालयासमोर सेंटर ऑफ ट्रेंड युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
रेल्वेच्या व इतर क्षेत्रातील वाढत चाललेल्या खाजगीकरणा वर कडाडून टिका करण्यात आली केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सिटू संघटनेच्या वतीने देशभरात निदर्शने करण्यात आली व रेल्वेच्या खाजगीकरणाच्या विरोधात सहाय्यक वरिष्ठ अभियंता राव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सिटूचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास पगारे, जिल्हा सेक्रेटरी तुकाराम सोनजे, मनमाड अध्यक्ष किशोर अहिरे, कार्याध्यक्ष जानी जार्ज अरुण दरगुडे* उपाध्य NRMU चे ओपन लाईन शाखा सचिव अंबादास निकम, अध्यक्ष शब्रिष नाय, एच.डी.डोगरे, सचिन काकड, रमेश केदारे, प्रवीण बागुल, अक्रम शेख, किरण कातकडे, उत्तम गांगुर्डे, मिलिंद लिहिणार, राजेंद्र मिस्तरी, संजय कदम, सतिष गांगुर्डे, सुनील गडवे, नीरज शिंदे, अजय पगारे, अजय उबाळे आदीसह उपस्थित होते.