चिंचवड : विश्वकर्मा जयंती पिंपरी चिंचवड शहरात विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील वैश्य सुतार समाज, मेवाडा सुतार समाज, गुर्जर क्षत्रिय समाज, जांगीड सुतार समाज बांधवांनी स्वतंत्र्यरित्या वेगवेगळ्या भागात विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करून उत्साहात साजरी केली.
निगडी येथे वैश्य सुतार पुना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, विश्वकर्मा युवा मंडळाचे अध्यक्ष नितीन सिंसागीया, गुर्जर क्षत्रिय कडीया समाजाचे अध्यक्ष शैलेश टांक यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचे उपस्थित बांधवांना वाटप करण्यात आले.
विपूल वाढीया, राजेश चुडासमा, जयेश वाडोदरीया, जयश्री मकवाना, धर्मेश पिंपलिया, हितेश रानपरीया, अमित सिंसागीया, जयंत पिपालिया, रषेश पिंपालिया, चिराग गढीया, अमित रानपरिया आदी उपस्थित होते.
‘स्किल इंडिया’ नव्हे ‘डेथ इन इंडिया’ – काशिनाथ नखाते
‘बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे sanitization सुरू’ संजय राऊत यांच्या ट्विटमुळे खळबळ
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ल्यावरील आंदोलनातील मुख्य आरोपी दीप सिध्दूचा अपघाती मृत्यू