पुणे : खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. खासदार कोल्हे यांनी आज निमगाव दावडी येथे बैलजोडीसमोर घोडेस्वारी करत आपला शब्द पूर्ण केला.
भिर्रर्रर्र..!
कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली व भंडाराही उधळला! pic.twitter.com/YoffaLaa6S— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 16, 2022
‘बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे sanitization सुरू’ संजय राऊत यांच्या ट्विटमुळे खळबळ
पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. निमगाव दावडी हा खंडोबाच्या मानाचा हा घाट आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील उपस्थिती दर्शविली, त्यावेळी शिरूर मतदारसंघातील मतदारांना बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते, ते आश्वासन आज कोल्हे यांनी पुर्ण केले. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीत दोन्ही हात सोडून अख्खा घाट घोडेस्वारी केली, यावेळी उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला.
दरम्यान, अमोल कोल्हे म्हणाले, “जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा महाराजांची शिकवण आहे भिंतीला पाठ लागल्यानंतर उसळायचे असते. त्यामुळे ज्यांना घोडी धरेल की नाही अशी शंका होती त्यांना उत्तर मिळाले आहे. दोन्ही हात सोडून अख्खा घाट घोडेस्वारी केली आहे. संसदेचे काम सुरू असताना घाटात येणे शक्य नसल्याने आता घोडेस्वारी केली.” असे ते म्हणाले.
जुन्नर : पेसा क्षेत्रातील अवैध माती उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी
बेरोजगारी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निदर्शने