Wednesday, July 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : देशातील पहिल्या ‘संविधान भवन’च्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

PCMC : देशातील पहिल्या ‘संविधान भवन’च्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, (PMRDA) आयुक्तांना दिले आदेश PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतीय संविधानासह अन्य देशाच्या संविधानांचा अभ्यास सर्वसामान्य नागरिकांना करता यावा. या करिता पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) ‘‘संविधान भवन’’ प्रस्तावित केले आहे. संविधान साक्षरता या हेतुने हाती घेतलेल्या या कामाला गती द्यावी, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. pcmc

मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित ‘‘संविधान भवन’’बाबत सकारात्मक चर्चा केली. (MLA Mahesh Landge)

तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये सदर संविधान भवन व विपश्यना केंद्र प्रस्तावित असून, प्राधिकरणाच्या सभा क्र. ३३७ दि. २२ जानेवारी २०१९ च्या विषय क्रमांक ४ अन्वये ठराव मंजुर केला आहे. त्यानुसार, पेठ क्रमांक ११ मेध्ये ‘‘संविधान भवन व विपश्यना केंद्र ’’ उभारणीसाठी मान्यता दिली आहे. pcmc

सदर दोन्ही प्रकल्प स्वतंत्रपणे विकसित करण्याची आवश्यकता आहे. प्रकल्प सल्लागार नियुक्ती व तज्ञ समितीची नेमणूक करण्यासह प्राधिकरण सभेची मान्यता मिळाली आहे. आता २०२१ मध्ये नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मध्ये विलिनीकरण झाले आहे. Pcmc news

PMRDA चा वाढलेला व्याप पाहता संविधान भवन उभारण्याच विलंब अथवा असमर्थता असेल, तर सदर आरक्षीत जागा पिंपरी-चिंचवड महापालिका हस्तांतरीत करावी, अशी आग्रही मागणी आमदार लांडगे यांनी केली. pcmc

यावर सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना संविधान भवन उभारणीसाठी पीएमआरडीए आणि पीसीएमसी यांनी एकत्रितपणे तातडीने कार्यवाही सुरू करावी, असे आदेश दिले आहे. महाराष्ट्रातील नव्हे, तर संपर्ण देशातील हे पहिलेच संविधान भवन ठरणार आहे.


भारतातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवड शहरात साकारले जात आहे.

जगातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, भारतीय संविधानाची जागृती व्हावी. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘संविधान भवन’’ सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तू उभारणीच्या कामाला गती द्यावी. यासाठी मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतली. त्यांनी संबंधित पीएमआरडीएच्या आयुक्तांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता-स्वातंत्र्य आणि लोकशाही विचारांचे जनत करणारे भारतातील पहिले संविधान भवन साकारले जात आहे. याचा अभिमान वाटतो. जगातील विविध राज्य घटनांचा अभ्यास करणारे अभ्यासक यानिमित्ताने शहरात येतील, ही निश्चितच महत्त्वपूर्ण बाब आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय