Wednesday, July 3, 2024
Homeजुन्नरJunnar : छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवास लोकार्पण सोहळा संपन्न

Junnar : छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवास लोकार्पण सोहळा संपन्न

जुन्नर / आनंद कांबळे : छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवास लोकार्पण सोहळा जुन्नर मध्ये संपन्न झाला. जुन्नर (Junnar) येथील शिवराय संकुलाचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते व माजी आमदार बाळासाहेब दांगट, अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर वन विभाग जुन्नर, सत्यशील शेरकर चेअरमन वि.स.सा.का.लि, मधुकर काजळे, प्रकाश ताजणे, उपसभापती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरसेवक भाऊ कुंभार, संदेश पाटील, सहा. संरक्षक वनीकरण, अमित भिसे, सहा. संरक्षक वन्यजीव संरक्षण अतिक्रमण निर्मूलन जुन्नर, वन परीक्षेत्र अधिकारी प्रदीप रौन्धळ आणि स्मिता राजहंस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय उद्यान व पर्यटक निवास लोकार्पण सोहळा पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात तुळस पूजनाने करण्यात आली. (Junnar)

यादरम्यान छत्रपती शिवराय वन उद्यान प्रवेशद्वार, कोनशिला उद्घाटन, वृक्षारोपण, पंचकर्म पाथवे, पर्यटक निवास उद्घाटन मान्यवरांच्या करण्यात आले.

छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवास उभारणी मध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी अजित अंबादास शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोयना (वन्यजीव), प्रदीप लक्ष्मण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर, निलेश कान्हव, अभिषेक सुधाकर वर्पे, अश्रुबा उत्तमराव चव्हाण, तुकाराम दत्तात्रय काळे, नितीन दशरथ विधाटे, वनपाल जुन्नर, देवीदास पांडुरंग मिसाळ, वनरक्षक जुन्नर, नारायण उत्तम राठोड, वनरक्षक कवठे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. (Junnar)

तसेच जागतिक वन्यजीव सप्ताह २०२३ मध्ये ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, प्रा. स्वप्निल कांबळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी, कु. कोकाटे प्रज्वल, कु. गोरक्ष कानडे, कु.सोनाली आभाळे, कु.गीता यादव, कु. कुणाल खोकराळे, कु. सिद्धी सोलाट, कु. कृष्णा गायकवाड कु. संकिता पारधी यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांतील शाळा, कॉलेजेस, बस स्थानक या ठिकाणी उत्कृष्ट पथनाट्य सादर केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. (Junnar)

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांनी छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटक निवास निर्मितीमागची भूमिका विशद केली. उपवनसंरक्षक यांनी ही संकल्पना जुन्नर पर्यटनास व आदिवासी भागातील रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी मांडल्याचे सांगून ती प्रत्यक्षात आणणारे वन अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक केले.

माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार जुन्नर यांनी बिबट निवारण केंद्राच्या स्थापनेबाबत आपले विचार व्यक्त करत भुतकाळातील आठवणींना उजाळा दिला व तालुक्यातील पहिलेच नावीन्यपूर्ण वन उद्यान निर्माण केल्यामुळे वन विभागाचे आभार मानले आणि वनविभाग करत असलेल्या कार्याची स्तुती केली.

अध्यक्षीय भाषणात बोलताना आमदार अतुल बेनके यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक असुन‌ जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत शासन पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी वन उद्यान आणि पर्यटक निवास यासारखे उपक्रम पर्यटन चळवळीला प्रोत्साहन देणारे आहेत. पर्यटन प्रेमींसाठी निवासी सोयीसाठी पर्यटन निवास यासारखे उपक्रम गरजेचे आहेत निश्चितपणे याचा फायदा पर्यटन विकासासाठी होईल. जुन्नर तालुक्यातील पर्यटन चळवळीला चालना देत असताना जबाबदार पर्यटन याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे याबाबत सांगितले व वनविभाग जुन्नरच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रम प्रसंगी विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, विविध पर्यटन संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित भिसे, वनसंरक्षक जुन्नर यांनी तर सूत्रसंचालन रमेश खरमाळे, वनरक्षक धामणखेल यांनी केले. तसेच कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदीप चव्हाण वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय