Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा कोणते खाते मिळणार ?

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नव्हते. यामुळे त्यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ यांनी पक्ष नेतृत्व, विशेषतः अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकाही केली होती. आज अखेर नाराज छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले आहे.

---Advertisement---

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळ यांची वर्णी लागेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. भुजबळ यांच्या नाराजीमुळे पक्षात आणि महायुतीत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आज (20 मे) मुंबईच्या राजभवानामध्ये 77 वर्षीय छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. अद्याप त्यांना कोणतं खातं दिलं जाणार याची माहिती समजू शकलेली नाही. मात्र अन्न व नागरी पुरवठा खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा : ब्रेकिंग : लाडक्या बहिणींना 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा)

Chhagan Bhujbal यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईतील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, “ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगलं. मी कोणत्याही खात्याची अपेक्षा ठेवलेली नाही. मुख्यमंत्री जे खाते देतील, ती जबाबदारी मी पार पाडेन.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.  (हेही वाचा : एसटी महामंडळात 10,000 ते 15,000 पदांसाठी मेगाभरती)

---Advertisement---

छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली आणि 1991 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ या पक्षात सामील झाले आणि पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. त्यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यापूर्वी सांभाळल्या आहेत.   (हेही वाचा : खळबळजनक : शाळेत तब्बल 20 फुटांचा किंग कोब्रा आढळला)

भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते मानले जातात. येवला-लासलगाव मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. यासोबतच, त्यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तसेच त्यांना अटक झाली होती. (हेही वाचा : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles