King Cobra in school : गजपती जिल्ह्यातील रायगडा ब्लॉकमधील एसएसडी उच्च माध्यमिक शाळेच्या वर्ग खोलीत तब्बल 20 फुट लांबीचा किंग कोब्रा आढळल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक भाषेत ‘अहिराज’ म्हणून ओळखला जाणारा हा विशाल साप शाळेच्या परिसरात आढळल्यानंतर तात्काळ साप बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी किंवा इजा झाली नाही, आणि सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. (हेही वाचा : मोठी बातमी : 100 दहशतवादी ठार, 9 छावण्या उद्ध्वस्त; भारतीय लष्कराची माहिती)
सविस्तर माहिती अशी कि, ओडिशातील गजपती जिल्ह्यातील रायगडा ब्लॉक येथील एसएसडी उच्च माध्यमिक शाळेत 30 एप्रिल 2025, संध्याकाळी किंग कोब्रा सापाच्या प्रजातीचा तब्बल 20 फूट लांबीचा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळची वेळ असल्याने शाळेत कोणीही विद्यार्थी नव्हते, हा साप शाळेतील एका शिपायाला दिसला होता. (हेही वाचा :विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, चाहत्यांना भावनिक पत्र)
King Cobra in school | स्नेक हेल्पलाइनला केला संपर्क
शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक स्नेक हेल्पलाइनला संपर्क केला. बचाव पथकाने अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने या किंग कोब्राला पकडले. त्यानंतर सापाला पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा : अभिनेता विजय देवरकोंडा भारतीय सैन्याला देणार आपल्या उत्पन्नाचा भाग)
स्नेक हेल्पलाइनच्या एका सदस्याने सांगितले, “हा किंग कोब्रा अत्यंत निरोगी आणि चांगल्या स्थितीत होता. आम्ही त्याला काळजीपूर्वक पकडले आणि नजीकच्या जंगलात सुरक्षितपणे सोडले.” त्यांनी पुढे नमूद केले की, गजपती जिल्ह्यातील दाट जंगल आणि ग्रामीण भागामुळे अशा मोठ्या सापांचे दर्शन दुर्मीळ नाही, परंतु शाळेसारख्या ठिकाणी अशी घटना असामान्य आहे. (हेही वाचा : ब्रेकिंग : लाडक्या बहिणींना 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा)