Saturday, December 21, 2024
Homeशिक्षणवर्षभरात राज्यातील सर्व शाळेत लावणार सीसीटीव्ही : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

वर्षभरात राज्यातील सर्व शाळेत लावणार सीसीटीव्ही : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 मुंबई : येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांची (Students) संख्या जास्त आहे. आशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण ६५ हजार जिल्हा परिषदेच्या(CCTV In ZP Schools) शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखील चालणार नाही तर त्याची व्यवस्थित देखभाल होण्याची गरज असल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी : आमदार, माजी आमदार यांना फक्त एकाच टर्मसाठी पेन्शन, भत्त्यांमध्येही होणार कपात – भगवंत मान

राज्य सरकारचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. राज्यात सध्या स्थितीमध्ये एकूण ६५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या तसेच राज्यातील प्रत्येक शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या वर्षाभरात शाळांचा प्राधान्य क्रम ठरवून हे काम पूर्ण केले जाईल. तसेस सर्व खासगी शाळांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात येतील असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

R R R चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला राडा ,रेकॉर्ड तोड कमाईची शक्यता !

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. तसेच गैर प्रकारांना आळा बसेल. येत्या वर्षभरात राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय