Hingoli, दि. ८ : हिंगोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नांदेड, हिंगोली, परभणी, व यवतमाळ जिल्ह्यांच्या १०० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघातून माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉम्रेड विजय रामजी गाभने यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची अखेरची तारीख होती. येथे मतदानाची तारीख २६ एप्रिल ही आहे.
मेळाव्याचे उद्घाटन माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी एका सविस्तर विवेचनातून केले. अध्यक्षस्थानी माकपचे राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. उदय नारकर हे होते. (Hingoli)
यावेळी पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य विजय गाभने, शेतकरी नेते डॉ.अजित नवले व किसन गुजर, माकप राज्य कमिटी सदस्य शंकर सिडाम, उद्धव पौळ, ॲड. भगवान भोजने, ॲड. अजय बुरांडे, व मारोती खंदारे यांनी मेळाव्यास संबोधित केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन अंकुश बुधवंत यांनी केले.
यावेळी जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिणे, धर्मांध व हुकूमशाही मोदी-प्रणित भाजप सरकारचा पराभव करण्याचे आणि या मतदारसंघात माकपला विजयी करण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे यांनी उपस्थितांना केले.
तसेच भाकप नेते शाम लाहोटी, शेकापचे भाई भारत जाधव, डॉ. बी. व्ही. डाखोरे, रमेश देवरे, विनोद गोविंदवार, रामकृष्ण शेरे, रामेश्वर पौळ, जनार्दन काळे, उज्वला पडलवार, दिपक लिपणे, दिगंबर काळे, संजय मानकर, नसीर शेख, खंडेराव कानडे, आडेलू बोनगीर, शेख चांद, गंगाधर गायकवाड, लिंबाजी कचरे, शाम सरोदे, मीना आरसे, रामराजे महाडीक, लता गायकवाड, करवंदा गायकवाड, अशोक बुरखुंडे, प्रल्हाद चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


हे ही वाचा :
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू
मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार