कोल्हापूर : बालसाहित्य कलामंच आयोजित व निर्मिती फिल्म क्लब निर्मित पिढ्यानंपिढ्या 33 कोटी देवांची मनोभावे पूजा करून देखील माणसांच्या घरातला अंधार मात्र कधीच संपला नाही. तो अज्ञानाचा अंधार संपवायचा असेल आणि माणसाचं घर प्रकाशमान करायचं असेल तर आपल्या घरात तथागत बुद्ध यायला पाहिजे हा अत्त! दीप! भव! अर्थात स्वयंप्रकाशित व्हा असा संदेश देणाऱ्या व लहान मुलांचा मोठा सहभाग असणाऱ्या बुद्धा….!! या वैचारिक व विद्रोही भूमिका मांडत परंपरावाद नाकारणाऱ्या फिल्मचा प्रीमियर शो महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी म्हणजे 14 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 12:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, स्वरा सामंत, तक्ष उराडे यांच्यासह बालकलाकारांनी दिली.
बुद्ध राजा होते तर त्यांनी घर का सोडले? धम्म म्हणजे काय? बुद्ध नवसाला पावतो का? बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत काय? ब्रम्हा, विष्णू, महेश व बुद्ध यांच्या मध्ये काय फरक आहे? बुद्ध जात, धर्म मानत होते का? बुद्ध खरंच अहिंसावादी होते काय? बुद्धांना फुलेच का वाहतात? पंचशील म्हणजे काय? निर्वाण म्हणजे काय? बुद्ध माणसांसाठी काय उपयोगाचा? बुद्धाच्या विचारांनी माणसाचा विकास कसा आणि कधी होणार? बुद्ध कोणाकोणाला होता येऊ शकते? आशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्याला घेऊन ही फिल्म तयार करण्यात आली आहे.
बुद्धा…! या फिल्मची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून या फिल्मची निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शन अनिल म्हमाने यांनी केले आहे तर डॉ. शोभा चाळके या फिल्मच्या निर्मात्या आहेत. या फिल्मच्या सहनिर्माता छाया पाटील (भगवा फौंडेशन), क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अरहंत मिणचेकर, कला दिग्दर्शक गंगाधर म्हमाने यांनी केले असून फिल्मचे तांत्रिक काम व्हिव्यूफाईंडर मीडिया स्टुडिओचे डी. ओ. पी. सुहास बोधे, शिवम बोधे व तुषार बोधे यांनी पाहिले आहे.
आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, स्वरा सामंत, तक्ष उराडे, स्वराज किरवेकर, स्वरल नामे, भूमी भस्मे, संस्कार येंडे, श्रीजा पाटील, ऋतुजा शिंदे, विघ्नेश शिंदे, हरिप्रिया खोत, प्रियाणी चिमगावकर, कोमल लांडगे, प्रांजल सुरवशी, प्रित्युश्री सुरवशी, इझयान मुरसल, विश्वजीत पाटील, वीरधवल पाटील, अतीफ काझी, नाज कुरणे, विहान वड्ड, पुष्कर कुसूरकर, प्रणव कुरणे, अनुष्का सुतार, अरिज कुरणे, भक्ती भस्मे, श्रावणी सांगलीकर, सक्षम मोहिते, शुभम सुतार आदी बाल कलाकार सह भदंत एस. संबोधी थेरो, सुनिल कांबळे, किशोर खोबरे, डॉ. निकिता खोबरे, संजयकुमार अर्दाळकर, शब्बीर काझी, छाया पाटील, वर्षा सामंत, राहुल काळे, अरिफ काझी, स्नेहल माळी, रुपेश कुसूरकर, समिधा येंडे, राजू भस्मे, रुपाली खंदारे, शिवाजीराव भिसे, सुषमा शिंदे, लक्ष्मी पुजारी, ज्योती सुरवशी, रईसा मुरसल, आयेशा काझी, आशिया कुरणे, रियाज कुरणे, विश्वास जगदाळे, मनिषा बिऱ्हाडे, संभाजी कांबळे यांच्यासह तीनशे हून अधिक कलाकारांनी या फिल्म मध्ये काम केले आहे.